September 13, 2024 1:09 PM

views 26

कमला हॅरिस यांच्यासोबत आणखी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये सहभागी न होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासह राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रेसिडेंन्शियल डिबेट अर्थात वादविवादात सहभागी होणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. फिलाडेल्फियामध्ये झालेल्या सुरुवातीच्या वादविवादात विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि महत्त्वाच्या वृत्त वाहिन्यांवरचे आमंत्रण हॅरिस स्वीकारत नसल्याचा दावा केला. हॅरिस यांनी आणखी वादविवादांची मागणी केली. मतदारांप्रती ते कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. एका सर्वेक्षणानुसार ६३ टक्के लोकांनी या वा...

August 3, 2024 12:31 PM

views 24

अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात होणार लढत

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून अधिकृतरीत्या उमेदवारी मिळवली आहे. यासाठी पक्षाच्या प्रतिनिधींची जितकी मतं आवश्यक आहेत, तितकी मतं हॅरिस यांना मिळाल्याची घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष जेमी हॅरिसन यांनी काल केली. एकंदर ४ हजार मतांपैकी २ हजार ३५० मतं हॅरिस यांना मिळाली. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात लढत होणार आहे.

July 27, 2024 2:47 PM

views 18

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी अध्यक्षपदाच्या ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी काल रात्री आपली उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली. यासाठी आवश्यक असणारे अर्ज त्यांनी काल जमा केले. प्रत्येक मत मिळवण्यासाठी आपण कष्ट करू, असं सांगून निवडणुकीत विजयी होण्याचा विश्वास त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे व्यक्त केला.   विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांच्या नावाची शिफारस केली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा या...

July 22, 2024 1:41 PM

views 15

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून जो बायडेन यांची माघार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. बायडेन यांनी काल समाजमाध्यमावर ही घोषणा केली. तसंच त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांना आपला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करणं ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असून डेमॉक्रॅटिक पार्टी आणि देशाच्या हितासाठी अध्यक्षपदाच्या उर्वरीत काळात आपलं कर्तव्य पूर्ण करण्यावर लक्ष देणार असल्याचं बायडेन म्हणाले. या आठवड्याच्या शेवटी आपण दे...