December 18, 2024 3:38 PM December 18, 2024 3:38 PM
11
कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची बातमी अफवा
कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची बातमी अफवाच ठरल्याचं पोलिसांनी आज स्पष्ट केलं आहे. कल्याण स्थानकात तीन तास कसून शोध घेतल्यानंतर पोलिसांनी स्थानकात बॉम्ब नसल्याची पुष्टी केली. एका अज्ञात इसमानं कल्याण रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याची माहिती कल्याण रेल्वे स्थानकात दिली होती. या अनुषंगानं पोलिसांनी श्वानपथकांच्या साहाय्यानं स्थानकाची कसून तपासणी केली. फोन करून खोटी माहिती देणाऱ्या अज्ञात इसमावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.