November 24, 2025 8:37 PM November 24, 2025 8:37 PM

views 31

कबड्डीच्या विश्वचषकाला सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला संघाची गवसणी

भारताच्या महिला कबड्डी संघानं सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. ढाका इथं झालेल्या सामन्यात त्यांनी आज चायनीज तैपेईच्या संघावर ३५-२८ अशी मात केली. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यात भारतीय संघ अजिंक्य राहिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल या संघाचं अभिनंदन केलं आहे.

October 23, 2025 2:51 PM October 23, 2025 2:51 PM

views 156

कबड्डीमध्ये भारताची गुणतालिकेत आघाडी

कबड्डीमध्ये, भारताने काल इसा स्पोर्ट्स सिटी हॉल येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या सामन्यात यजमान बहरीनचा 84-40 असा पराभव केला. इशांत राठीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग पाचवा सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू ठेवली. यासह, भारताने गुणतालिकेत आघाडी घेतली आहे आणि अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे.

March 24, 2025 9:46 AM March 24, 2025 9:46 AM

views 42

कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताला पुरुष आणि महिला गटात विजेतेपद

इंग्लंडमधील वुल्व्हरहॅम्प्टन इथं झालेल्या 2025 च्या पुरुष आणि महिला कबड्डी विश्वकरंडक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष संघानं काल अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडचा 44-41 असा पराभव केला. यापूर्वी, भारतीय महिला संघानं त्याच ठिकाणी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा 57-34 असा दणदणीत पराभव केला. आशियाच्या बाहेर पहिल्यांदाच झालेल्या या स्पर्धेत बर्मिंगहॅम, कोव्हेंट्री, वॉल्सॉल आणि वुल्व्हरहॅम्प्टन इथं सामने पार पडले. 2019 मध्ये मलेशियानं आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत भारतानं पु...