October 24, 2025 3:04 PM October 24, 2025 3:04 PM

views 63

भारतीय कबड्डी संघानं पटकावलं सुवर्ण पदक

बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियायी युवा स्पर्धांमध्ये १८ वर्षांखालील मुलं आणि मुलींच्या भारतीय कबड्डी संघानं सुवर्ण पदक पटकावलं आहे. मुलींच्या संघानं इराणला ७५-२१ असं १२ वर्षातल्या सर्वात मोठ्या फरकानं नमवलं. मुलांच्या संघानं इराणला ३५-३२ असं हरवलं.  या स्पर्धेत मुलींच्या १०० मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या स्पर्धेत ठाण्याची शौर्या अंबुरे हिला रजत पदक मिळालं.

October 23, 2025 2:51 PM October 23, 2025 2:51 PM

views 156

कबड्डीमध्ये भारताची गुणतालिकेत आघाडी

कबड्डीमध्ये, भारताने काल इसा स्पोर्ट्स सिटी हॉल येथे झालेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुलांच्या सामन्यात यजमान बहरीनचा 84-40 असा पराभव केला. इशांत राठीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग पाचवा सामना जिंकून विजयी घोडदौड सुरू ठेवली. यासह, भारताने गुणतालिकेत आघाडी घेतली आहे आणि अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे.

March 21, 2025 9:45 AM March 21, 2025 9:45 AM

views 13

Kabaddi World Cup : भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने काल वेल्सचा 102-47 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व आणि महिला संघाचा उपांत्यफेरीतील सामने आज होणार आहेत.