September 26, 2025 2:37 PM

views 22

देशभरात ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल 4G यंत्रणा बसवण्याची केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा बसवण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज माध्यमांसमोर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील. ही यंत्रणा नंतर फाय-जीमध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक भागात ही यंत्रणा बसवली जाईल. डिजिटल भारत निधीद्वारे देशात १०० टक्के फोरजी सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नेटवर्कच्या माध्यमातून ३० हजार गावं जोडली गेली आहेत.

December 28, 2024 4:09 PM

views 16

भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली.  भारतीय टपाल विभागाला नफ्यात आणण्यासाठी काही उपाययोजना सादर करत त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा आरखडा शिंदे यांनी सीतारामन यांना सादर केला. टपाल विभागाला नवी झळाळी मिळावी, यासाठी काही योजना आखल्या असून हा विभाग अधिकाधिक डिजीटल करण्यावर भर देणार, असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.    देशभरातील टपाल कार्यालयांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करणं, टपाल कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचं नूतनीकरण कर...

December 16, 2024 8:11 PM

views 18

ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे-ज्योतिरादित्य शिंदे

ईशान्येतल्या राज्यांमधे केंद्रसरकार या राज्यांच्या भागीदारीत काम करत आहे, असं ईशान्य क्षेत्र विकासमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत या राज्यांच्या गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. या राज्यांमधे क्षमता, विशेषता, आणि मलेशिया, सिंगापूर, जपान, कंबोडिया इत्यादी अग्नेय आशियातल्या देशांशी संपर्क अनुकूलता असल्यानं गुंतवणुकदारांनी या राज्यांमधे गुतवणूक करावी, असं आवाहन त्यांनी केलं.    मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ माणिक साहा यांचीही भाषण यावे...

November 7, 2024 6:46 PM

views 16

लाडक्या बहिणींची रक्कम वाढणार असून घरोघरी लखपती कुटुंब होतील – ज्योतिरादित्य शिंदे

महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणीसाठी  पंधराशे रुपये दिले. ही रक्कम पुढे वाढवणार असून घरोघरी लखपती कुटुंबं होतील असं आश्वासन भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज अहिल्यानगर इथं दिलं.  कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधल्या राशीन इथं आयोजित जाहीर सभेत तो बोलत होते. सिंदिया यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे तसंच श्रीगोंदा मतदारसंघाचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्यासाठी जाहीर सभा घेतली.

September 1, 2024 7:02 PM

views 19

वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली – मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

वित्तीय समावेशनाचं उद्दिष्ट गाठण्यात बँकांनी आपल्या सुलभ आणि किफायतशीर सेवांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं केंद्रीय दूरसंवादमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सातव्या स्थापना दिनानिमित्त त्यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये या बँकेच्या कामगिरीचा उल्लेख केला आहे. या बँकेत आतापर्यंत ९ कोटी ८८ लाख भारतीयांनी खाती उघडली आहेत. याशिवाय वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना ४५ हजार कोटी रुपयांचे लाभ या खात्यांमधून दिले आहेत, अशी माहिती त्...