October 18, 2025 1:41 PM October 18, 2025 1:41 PM
20
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला कांस्यपदक
चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्यपदक पटकावून इतिहास रचला. या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज आहे. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या एला गिबसन हिच्यावर १५० विरुद्ध १४५ गुण मिळवून मात केली