July 16, 2024 6:45 PM July 16, 2024 6:45 PM
17
राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.