July 26, 2025 8:43 PM July 26, 2025 8:43 PM

views 84

सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही-भूषण गवई

सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाल्यावर आपण कायदेविषयक सल्ला- मार्गदर्शन आणि लवाद या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं आहे. अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. या ई वाचनालयामुळे वकीलांना कायदेशीर संदर्भ, निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि इतर न्यायाधीश तसंच इतर मान्यवर...

July 8, 2025 6:43 PM July 8, 2025 6:43 PM

views 19

घटना दुरुस्तीकरून राज्य घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येत नाही-सरन्यायाधीश

भारतीय राज्यघटनेतली मूलभूत तत्वं आणि मूलभूत अधिकार हे घटनेचा आत्मा आहेत, या दोन्हींचा एकत्र विचार करून सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी काम केलं पाहिजे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उपस्थितांना संबोधित करत होते. कुठल्याही पदासोबत जबाबदारीही येते आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेल्या मला सरन्यायाधीश पदाची जबाबदारी मिळाली ही अभिमानाची गोष्ट आहे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य घटनेमागची बाबासाहेबांची भूमिका उप...

May 14, 2025 12:58 PM May 14, 2025 12:58 PM

views 26

न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे ५२ वे सरन्यायाधीश

देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी शपथ दिली. या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखर, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. गवई यांच्या मातोश्री देखील या सोहळ्यास उपस्थित होत्या. न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे ६ महिने १० दिवस या पदावर कार्यरत राहतील.

May 13, 2025 8:14 PM May 13, 2025 8:14 PM

views 16

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा उद्या शपथविधी

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त झाले. १० नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.    भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांचा उद्या शपथविधी होणार आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. न्यायमूर्ती गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश अ...

April 30, 2025 4:32 PM April 30, 2025 4:32 PM

views 14

न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या १४ तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली.

April 16, 2025 8:53 PM April 16, 2025 8:53 PM

views 25

आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे केली आहे. गवई सध्या सर्वोच्च न्यायालयाचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना १३ मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतर न्यायमूर्ती गवई हे भारताचे ५२ वे सरन्यायाधीश होतील.

March 22, 2025 5:24 PM March 22, 2025 5:24 PM

views 15

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्दसाठी एकत्रित काम करण्याचं न्या. भूषण गवई यांचं आवाहन

मणिपूरमधे शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होण्यासाठी तिथल्या लोकांनी एकत्र काम केलं पाहिजे,  असं आवाहन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं आहे. गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं एक शिष्टमंडळ आज हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर गेलं होतं. गवई यांनी विक्रम नाथ, एम एम सुंद्रेश आणि के व्ही विश्वनाथन यांनी छुराचांदपूर जिल्ह्यातल्या मदत छावणीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय राज्यघटनेनं सर्व नागरिकांना समान अधिकारांची हमी दिली आहे, असंही ते म्हणाले.   गवई अध्यक्ष ...