December 21, 2025 10:14 AM December 21, 2025 10:14 AM

views 4

नागरिकांना स्वभाषेत निकाल उपलब्ध होण्यासाठी संवैधानिक संस्थांनी संविधान भावनेने काम करावे – सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

न्यायिक प्रक्रिया आणि न्यायालयाचे निकाल नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये उपलब्ध होतील याची खातरजमा करण्यासाठी सर्वच संवैधानिक संस्थांनी संविधान भावनेने काम करावं असं मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील इटावा इथल्या हिंदी सेवा निधी ट्रस्टच्या 33 व्या वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती बोलत होते. भाषेसंबंधातील संवैधानिक तरतुदींची देशभरात अंमलबजावणी केली जाईल अशी अपेक्षा आहे. संवैधानिक आणि कायदेशीर तरतुदींनुसार इंग्रजी ही सर्वौच्च न...

June 27, 2025 9:59 AM June 27, 2025 9:59 AM

views 10

न्यायाधीशांनी न्यायाच्या चौकटीत राहत सामाजिक भान ठेवून दिलेला न्याय अधिक महत्वाचा-सरन्यायाधीशांचं प्रतिपादन

न्यायाधीशांनी न्यायाच्या चौकटीत राहत सामाजिक भान ठेवून दिलेला न्याय अधिक महत्वाचा असतो, न्यायाधीशांनी घटनात्मक मूल्यांची बांधिलकी ठेवली तर न्यायदान सुकर होतं असं प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातर्फे छत्रपती संभाजीनगर इथं सरन्यायाधीश भूषण गवई यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

September 22, 2024 3:45 PM September 22, 2024 3:45 PM

views 10

पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

महाराष्ट्रात पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा...