September 6, 2024 10:59 AM September 6, 2024 10:59 AM
23
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत, ज्युदोमध्ये कपिल परमारची ऐतिहासिक कामगिरी
पॅरिस इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील ज्युदो खेळात, पुरुषांच्या 60 किलो वजनीगटात भारताच्या कपिल परमार याने कास्य पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत ज्युदो खेळात भारताने पहिल्यांदाच पदक पटकावलं आहे. त्याने ब्राझीलच्या खेळाडूचा 10-0 असा धुव्वा उडवला. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपति द्रौपदी मूर्मू यांनी कपिल परमारचं अभिनंदन केलं आहे. 'अनेक अडथळ्यांवर मात करत, पॅरालिम्पिकमध्ये ज्युदो स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून कपिलने इतिहास रचला आहे.' असं त्यांनी आपल...