April 12, 2025 12:39 PM April 12, 2025 12:39 PM

views 11

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते ओडिशात आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ

केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्या हस्ते काल ओडिशात आयुषमान भारत योजनेचा शुभारंभ झाला. गेल्या सहा वर्षात गरिबांच्या उपचारांवर सव्वा लाख कोटी रुपये खर्च केल्याचं सांगून नड्डा यांनी ओडिशा राज्य सरकारच्या गोपबंधू जन आरोग्य योजनेसमवेत आयुषमान भारत ही योजनाही राबवण्यात येणार असून यासाठी केंद्रासोबत एक सामंजस्य करार केला आहे. या एकत्रीकरणामुळे, राज्यातील आदिवासी नागरिकांसह साधारणपणे एक कोटी कुटुंबांमधील सुमारे साडेतीन कोटी लोकांना या एकत्रित योजनेअंतर्गत सामावून घेतले जाईल.

March 28, 2025 1:38 PM March 28, 2025 1:38 PM

views 13

एम्स रुग्णालयांमधील आरोग्यसेवेत तडजोड होणार नाही -आरोग्य मंत्री

एम्स रुग्णालयांमधे रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही अस केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. आयुष्मान भारत योजनेअंतर्गात ६२ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना विमा कवच देण्यात आलं आहे असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. यात ६ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असून साडेचार कोटी कुटुंबांचा समावेश आहे. राज्यसभेत समाजवादी पार्टीचे रामजी लाल सुमन यांनी राणा संगा यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्ष स...

March 18, 2025 8:38 PM March 18, 2025 8:38 PM

views 17

जे पी नड्डा यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांची घेतली भेट

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज न्यूझिलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांची भेट घेतली.    नवी दिल्लीत झालेल्या या भेटीत बोलताना नड्डा यांनी  नवजात शिशू ते वयोवृद्ध यांच्यासाठीच्या आरोग्य सुविधांमध्ये देशाने केलेली प्रगती अधोरेखित केली.

December 29, 2024 8:09 PM December 29, 2024 8:09 PM

views 15

निवडणूक आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक नवी दिल्लीत सुरु

निवडणूक आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक आज नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात सुरु आहे. दुपारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी एका सत्राला संबोधित केलं. पुढच्या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत जवळपास पक्षकार्यकारिणीच्या मंंडल तसंच जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरच्या निवडणुका निम्म्या राज्यांमध्ये घेण्याच्या दृष्टीने ही आढावा बैठक घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

December 25, 2024 3:27 PM December 25, 2024 3:27 PM

views 9

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक सुरु

मित्रपक्षांबरोबरचा समन्वय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी एनडीए सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.  या बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू , केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, नागरी विमानउड्डाण मंत्री राममोहन नायडू किंजरपु यांच्यासह अनेक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते.

December 17, 2024 1:17 PM December 17, 2024 1:17 PM

views 12

भारत लोकशाहीची जन्मभूमी आहे – मंत्री जगतप्रकाश नड्डा

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यसभेतल्या चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. सभागृहाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आपल्या भाषणात सांगितलं की भारत केवळ जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं नव्हे तर लोकशाहीची जन्मभूमी देखील आहे. भारतीय संस्कृती आणि परिसंस्थेत स्वातंत्र्य, समता आणि समावेशन तसंच नागरिकांना सन्मानाने जगण्याची संधी ही लोकशाही तत्वं मुळापासून रुजली आहेत असं ते म्हणाले. 

November 13, 2024 7:06 PM November 13, 2024 7:06 PM

views 14

प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामुळे भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल – जे. पी. नड्डा

भाजपाच्या नेतृत्त्वाखालच्या केंद्र सरकारने केलेली विकासकामं आणि प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामुळे लवकरच भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज मुंबईत व्यक्त केला. विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांची त्यांनी आज भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सरकारच्या विविध योजनांमुळं देशाची आर्थिक घडी बसायला तसंच नागरिकांचं जीवनमान सुधारण्याला मदत झाली. भारताची आर्थिक प्रगतीही होत असून त्याची दखल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही घेतल्याचं नड्डा याव...

September 19, 2024 6:05 PM September 19, 2024 6:05 PM

views 15

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचं संकल्प पत्र प्रसिद्ध

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीचं संकल्प पत्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज रोहतकमध्ये प्रसिद्ध केलं. लाडकी बहिण योजनेच्या धर्तीवर महिलांना दरमहा २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं यात दिलंय. सर्व कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना अतिरीक्त ५ लाख रुपयांचे उपचार मोफत देण्याचं आश्वासन यात आहे.   १० औद्योगिक शहरांची निर्मिती आणि प्रत्येक शहरात ५० हजार स्थानिक युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन भाजपानं दिलंय. तसंच २ लाख युवकां...

July 17, 2024 6:12 PM July 17, 2024 6:12 PM

views 8

आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांची CDSCO अधिकाऱ्यांसह आढावा बैठक

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी CDSCO अर्थात केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेच्या अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्ली इथं आढावा बैठक घेतली. आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.   औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता राखण्याबाबत नियंत्रण ठेवण्याचं काम CDSCO करते. तत्पूर्वी नड्डा यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजनांचा आढावा घेतला होता.

June 19, 2024 8:31 PM June 19, 2024 8:31 PM

views 11

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी घेतला उष्णतेच्या लाटेचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज देशातल्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष निर्माण करण्याचे निर्देश दिले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अजय चौहान यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उष्णतेच्या लाटेमुळं दिल्लीतल्या विविध रुग्णालयात सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालय नवीन धोरणांवर काम करत आहे, असंही ते म्हणाले.