December 15, 2025 7:22 PM December 15, 2025 7:22 PM
13
प्रधानमंत्री मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अम्मान इथल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे त्यांचे आभार मानले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्या निमंत्रणावरून ते जॉर्डनला भेट देत आहेत. यादरम्यान राजे अब्दुल्ला आणि प्रधानमंत्री जाफर हसन यांच्याशी प्रधानमंत्री मोदी सखोल द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच जॉर...