August 22, 2024 7:07 PM August 22, 2024 7:07 PM
7
वाढवण बंदर उभारणी प्रकल्पाच्या माध्यमातून १० लाख रोजगाराची निर्मिती होणार
जेएनपीएच्या माध्यमातून वाढवण बंदराची उभारणी होत असून, प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज सांगितलं. त्यांनी आज जेएनपीएला भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण बंदर हे देशातं सर्वोत्तम बंदर बनणार असून, कमीत कमी वेळेत या बंदराचं काम पूर्ण केलं जाईल, असं ते म्हणाले. जेएनपीए हे हरित बंदर केलं जाणार असून, तिथून अल्पावधीत एक कोटी कंटेनरची वाहतूक केली जाईल, असं सो...