May 16, 2025 8:28 PM May 16, 2025 8:28 PM

views 56

सन २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना प्रदान

संस्कृत भाषापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य आणि उर्दू कवी गुलझार यांना २०२३ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आज झालेल्या  ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या साहित्यविषयक पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही पुरस्कारविजेत्यांचं अभिनंदन केलं. समाजाला जागृत करून एकत्र आणण्याचं महत्वाचं काम साहित्य करते, १९ व्या शतकाच्या समाजप्रबोधनाच्या काळापासून २० व्या शतकातल्या स्वातंत्र्यलढ्या...

March 22, 2025 8:41 PM March 22, 2025 8:41 PM

views 57

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

साहित्यक्षेत्रात अतिशय मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रसिद्ध हिंदी लेखक, कवी आणि निबंधकार विनोद कुमार शुक्ल यांना जाहीर झाला आहे. ११ लाख रुपये रोख, सरस्वतीची कांस्यप्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ८८ वर्षांचे शुक्ल, हा पुरस्कार मिळवणारे हिंदीतले बारावे, तर छत्तीसगडचे पहिलेच साहित्यिक आहेत. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ या त्यांच्या साहित्यकृतीसाठी १९९९ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ‘नौकर की कमीज’ ही त्यांची कादंबरी आणि ‘सब कुछ होना...