September 30, 2024 9:23 AM September 30, 2024 9:23 AM

views 9

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत काल एक दहशतवादी मारला गेला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. आकाशवाणी जम्मू प्रतिनिधीनं दिलेल्या वृत्तानुसार, काल कथुआ जिल्ह्यातील बिलावर तहसीलमधील कोगमांडली इथं झालेल्या चकमकीच्या घटनास्थळी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. गावात दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.

September 25, 2024 2:38 PM September 25, 2024 2:38 PM

views 17

१५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ काश्मीरला भेट

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची पाहणी करण्यासाठी १५ देशांमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळ आज काश्मीरला भेट दिली. यात अमेरिका, मेक्सिको, गयाना, दक्षिण कोरिया, सोमालिया, पनामा, सिंगापूर, नायजेरिया, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, टांझानिया, रवांडा, अल्जेरिया आणि फिलिपाईन्स या देशातल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

September 23, 2024 2:13 PM September 23, 2024 2:13 PM

views 10

जम्मूकाश्मीर विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार

जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रियासी, राजौरी, पूंछ, श्रीनगर आणि बडगाम या पाच जिल्ह्यांमधल्या २६ मतदारसंघांसाठी येत्या बुधवारी २५ सप्टेंबर रोजी मतदान होईल. येत्या ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पूंछ आणि श्रीनगरमध्ये प्रचारसभांना संबोधित करत आहेत. नॅशनल कॉन्फरन्स - काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार शहानवा...

September 17, 2024 8:05 PM September 17, 2024 8:05 PM

views 17

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या २४ मतदारसंघांमध्ये मतदान

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे. ९० अपक्षांसह एकूण २१९ उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. सात जिल्ह्यांमधल्या मिळून २४ विधानसभा मतदारसंघांमधे मतदान होणार असून त्यात जम्मूतले ४ तर काश्मीर खोऱ्यातले १६ मतदारसंघ आहेत. ऑगस्ट २०१९ मधे कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश घोषित झाला आणि त्यानंतर प्रथमच तिथं विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या दृष्टीनं जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासन सज्ज असून अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बज...

September 13, 2024 12:38 PM September 13, 2024 12:38 PM

views 9

जम्मू आणि काश्मीर : पूंछमध्ये एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक

जम्मू आणि काश्मीरमध्ये, पूंछ जिल्ह्यात सुरनकोटच्या पोथा बायपास इथं सुरक्षा दलांनी काल संध्याकाळी जम्मू आणि काश्मीर गझनवी फोर्स संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकं आणि दारूगोळ्यांसह अटक केली. प्राथमिक तपासात त्याची ओळख दर्याला नौशेरा इथला रहिवासी मोहम्मद शाबीर अशी झाली आहे. तो पाकव्याप्त काश्मीर इथल्या प्रमुख दहशतवाद्याच्या संपर्कात होता. याबाबत अधिक तपास सुरू असून आणखी अटक होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

September 9, 2024 2:52 PM September 9, 2024 2:52 PM

views 9

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. नौशेराच्या लाम परिसरात काही संशयास्पद हालचाली नजरेस आल्यावर भारतीय लष्करानं काल रात्री ऑपरेशन कांची ही शोधमोहीम सुरु केली. संबंधित परिसरात पूर्णपणे उजेड करुन देखरेख वाढवली. या मोहिमेदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर प्रत्युत्तरात लष्कराने केलेल्या गोळीबारात किमान २ दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज आहे. शोधमोहीम अद्याप सुरु असून त्यात मोठा शस्त्रसाठा मिळाल्याचं सेनादल सूत्रां...