July 12, 2025 7:49 PM July 12, 2025 7:49 PM

views 14

जयंत पाटील यांच्या राजीनामाच्या वृत्ताचं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी या बातम्या म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जयंत पाटील हेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्ष एका नियमानुसार आणि शिस्तीनुसार चालतो, असंही त्यांनी नमूद केलं आहे.