August 24, 2024 7:41 PM August 24, 2024 7:41 PM

views 4

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल – जितेंद्र आव्हाड

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच मोठा भाऊ असेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बदलापूरसह संपूर्ण राज्यातून समोर येणाऱ्या बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील, या अनुषंगानं या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय जेव्हा होईल, तेव्हा लगेचच तो जाहीर क...