September 17, 2024 6:35 PM September 17, 2024 6:35 PM

views 8

मोदी सरकारच्या सऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत सुमारे ३ हजार ४८ कोटी रुपयांचं कर्ज वितरित

केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या १०० दिवसात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत सुमारे ३ हजार ४८ कोटी रुपयांचं कर्ज वितरित केलं आहे. केंद्रीय सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांजी यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमातंर्गत २६ हजारापेक्षा जास्त सुक्ष्म उद्योग सुरु झाले असून सुमारे २ लाख १० हजार रोजगार संधी निर्माण झाल्या, असं ते म्हणाले.   

August 31, 2024 2:42 PM August 31, 2024 2:42 PM

views 7

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जीतन राम मांझी खादी महोत्सवाबाबत घेतली आढावा बैठक

खादी आणि ग्रामोद्योग योजनांवर लक्ष केंद्रित करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सखोल आणि विस्तृत प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री जितन राम मांझी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत खादी महोत्सव २०२४ च्या आढावा बैठकीत बोलत होते. देशात खादीला चालना मिळण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. देशभरात लोकांना खादीची वस्त्रं वापरण्यासाठी प्रोत्साहन देत ग्रामीण भागात रोजगार निर्मितीत योगदान द्यावं असं आवाहन मांझी यांनी के...