January 22, 2026 3:53 PM
25
जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अर्जांची छाननी सुरु
राज्यातल्या १२ जिल्हा परिषदांमधल्या मिळून १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होतआहे. छाननी झाल्यावर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. उद्या आणि परवा तसंच येत्या मंगळवारी म्हणजे २३, २४ आणि २७ तारखेला दुपारी ११ ते ३ या वेळात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप २७ जानेवारीला दुपारी साडेतीननंतर प्रसिद्ध होईल. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर मतमोजणी ७ फेब्रुवारीला होईल.