January 1, 2026 2:30 PM
24
न्यूयॉर्कच्या महापौरपदी डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते जोहरान ममदानी यांनी घेतली शपथ
जोहरान ममदानी यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाचा पदभार काल रात्री एका समारंभात स्वीकारला. ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना ममदानी यांनी महापौरपदाची शपथ घेतल्यानंतर व्यक्त केली. न्यूयॉर्कच्या ऍटर्नी जनरल लिटिया जेम्स यांनी त्यांना शपथ दिली. या समारंभाला लोकशाही समाजवादी नेते बर्नी सँडर्स उपस्थित होते. ममदानी ४ नोव्हेंबर २०२५ ला महापौरपदी निवडून आले होते.