July 16, 2024 3:36 PM July 16, 2024 3:36 PM

views 8

नीट पेपर फुटी प्रकरणी झारखंडमध्ये एकाला अटक

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने काल रात्री झारखंडमधे हजारीबाग इथल्या एका गेस्ट हाऊसमधून एकाला अटक केली आहे. त्याच बरोबर हजारीबाग इथून अटक झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.

July 4, 2024 8:09 PM July 4, 2024 8:09 PM

views 7

हेमंत सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन इथं झालेल्या कार्यक्रमात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयानं सोरेन यांना जामीन दिल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला होता.

June 28, 2024 10:31 AM June 28, 2024 10:31 AM

views 7

नीट-युजी परिक्षेतील पेपरफुटी प्रकरणी झारखंडमधील ओयासीस शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी

वैद्यकीय पदवीपूर्व प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट-युजी परिक्षेतील पेपरफुटी प्रकरणी केंद्रिय अण्वेषण विभाग झारखंडमधील हजारीबाग इथल्या ओयासीस शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी करत आहे. या मुख्याध्यापकांची हजारीबाग शहरासाठीचे नीट परिक्षा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.