November 24, 2024 1:41 PM November 24, 2024 1:41 PM

views 7

झारखंडमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी इंडिया आघाडीची रांचीमध्ये बैठक

झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्याच्या निवडीसाठी घटकपक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज रांची इथं होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार या बैठकीला हजर राहतील. इंडिया आघाडीच्या विधानसभा पक्षनेतेपदी हेमंत सोरेन यांची निवड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर हेमंत सोरेन झारखंडमध्ये सरकारस्थापनेचा दावा करतील. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ८१ पैकी ३४ जागां...

November 8, 2024 9:45 AM November 8, 2024 9:45 AM

views 10

झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काल, एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक सभा पार पडल्या. हजारीबाग इथल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कारभारावर टीका करत नागरिक त्यांच्या चुकीच्या कारभारावर नाखूष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी भाजपवर टीका करत त्यांच्या सत्ताकाळात राज्य पिछाडीवर गेल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस, आरजेडी, एजेएसयू आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही राज्याच्या वि...

November 7, 2024 3:29 PM November 7, 2024 3:29 PM

views 10

मतदारांना प्रलोभन देण्याच्या कारवाईत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड जमा

महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत ५५८ कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ तसंच मौल्यवान धातू जप्त केले असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगानं दिली आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे २८० कोटी रुपये, तर झारखंडमधून १५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचं आयोगानं कळवलं आहे. &nbsp...

November 6, 2024 11:10 AM November 6, 2024 11:10 AM

views 5

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये एकत्रित जाहीर सभा घेत प्रचाराचं रणशिंग फुंकलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही काल राज्यात ठीकठिकाणी ...

November 4, 2024 8:12 PM November 4, 2024 8:12 PM

views 18

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली – प्रधानमंत्री

हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या लोकांची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज झारखंड मधल्या गढवा इथं केली. ते झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

November 4, 2024 1:13 PM November 4, 2024 1:13 PM

views 14

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्र्यांच्या आज दोन प्रचारसभा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन प्रचारसभा घेत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार विकासात खोडा घालत असल्याचा आरोप गढवा इथल्या सभेत मोदी यांनी केला.   विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर झारखंडमध्ये मोदींची ही पहिलीच निवडणूक प्रचार सभा आहे. चाईबासा इथं दुसरी सभा होणार असल्याची माहिती, झारखंड भाजपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी दिली आहे. झारखंडमधे 13 आणि 20 न...

November 1, 2024 2:38 PM November 1, 2024 2:38 PM

views 13

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यासाठी 634 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.   झारखंडमध्ये, पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या १३ नोव्हेंबरला तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान, 20 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांत तर, दुसऱ्या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

October 21, 2024 2:56 PM October 21, 2024 2:56 PM

views 20

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेसाठी जागावाटपाबाबत चर्चांना वेग

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीमधे घटक पक्षांच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.

October 18, 2024 3:54 PM October 18, 2024 3:54 PM

views 7

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. २५ ऑक्टोबरपर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांमधे १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. राज्यात भाजपा, एजेएसयू, संयुक्त जनता दल आणि चिराग पासवान यांच्या एलजीपी पक्षांनी आघाडी केली असून झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस,राष्ट्री...

August 31, 2024 12:15 PM August 31, 2024 12:15 PM

views 15

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल रांची इथं आयोजित कार्यक्रमांत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. झारखंड मुक्ती मोर्चाचे माजी नेते बाबूलाल सोरेन यांचा मुलानेही भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला बाबुलाल मरांडी, शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्व सरमा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. राज्यातील संथाल परगणा भागात बांग्लादेशातील स्थलांतरितांची संख्या पाहता आदिवासींची ओळख आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याचं सोरोन यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या स्थलांतरितांमु...