November 18, 2024 7:51 PM November 18, 2024 7:51 PM
14
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार पात्र ठरले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यास...