January 24, 2026 8:02 PM
2
झारखंडमधल्या सारंद जंगल परिसरात झालेल्या चकमकीत चकमकीत १६ नक्षलवादी ठार
झारखंडमधल्या सारंद जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी सुरु झालेली सुरक्षा दलांची चकमक आज दुसऱ्या दिवशीही अखंड सुरु आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी आज एका महिला नक्षलवाद्याला ठार केलं. त्यामुळं या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १६ वर पोचली आहे. सुरक्षा दलांनी ही मोहीम अधिक तीव्र केली असून ते उर्वरित नक्षलवाद्यांचाही कसून शोध घेत आहेत.