November 15, 2025 1:48 PM November 15, 2025 1:48 PM
15
झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आज झारखंडच्या स्थापना दिनानिमित्त तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांच्या मातीतल्या प्रतीभाशाली आणि मेहनती लोकांनी राज्य आणि देशाचा गौरव वाढवला, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. आदिवासी संस्कृतीने समृद्ध भगवान बिरसा मुंडा यांच्या राज्याचा इतिहास साहस, संघर्ष आणि अभिमानाच्या गाथांनी व्यापला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या...