November 2, 2024 3:02 PM November 2, 2024 3:02 PM

views 13

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर, आता या टप्प्यात तिथे ५२८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. या टप्प्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी बत्तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तिथे पहिल्या टप्प्यासाठी येत्या १३ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचारानंही वेग घेतला असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमि...

October 26, 2024 7:10 PM October 26, 2024 7:10 PM

views 11

झारखंडच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम आखणार

झारखंडच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये माओवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम आखणार असल्याचं झारखंडचे पोलिस महासंचालक अजय कुमार सिग यांनी सांगितलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, निवडणूका जाहीर झाल्यापासून सुमारे ५७ कोटी ६७ लाख रुपये किंमतीची अवैध सामग्री आणि रोख रक्कम जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या १९ तक्रारी दाखल केल्याचंही त्यांनी सांगितलं.

October 26, 2024 10:53 AM October 26, 2024 10:53 AM

views 7

झारखंड निवडणुकीचे 1 हजार 609 उमेदवारी अर्ज दाखल

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकंदर 1 हजार 609 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी संपली. बरकट्ठा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 70 अर्ज दाखल झाले. या पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला 43 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.   झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्...