November 24, 2024 6:36 PM November 24, 2024 6:36 PM

views 6

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची इंडिया आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची इंडिया आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांची भेट घेतली आणि राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. तत्पूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नव्या सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबरला होईल, अशी माहिती त्यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीला ५६ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २४ जागांवर विजय मिळाला आहे...

November 23, 2024 6:53 PM November 23, 2024 6:53 PM

views 1

झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा पुन्हा सत्तेकडे

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांच्या आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार झारखंड मुक्ती मोर्चानं १४ जागांवर विजय मिळवला आहे, तर २० जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाला ४ जागा, तर १७ जागांवर आघाडी आहे. काँग्रेसला ५ जागांवर विजय, तर ११ जागांवर आघाडी आहे. कम्युनिस्ट पक्ष मार्क्सिस्ट लेनिनिस्टला एका जागेवर विजय आणि एका जागेवर आघाडी मिळालेली आहे. लोक जनशक्ती पक्ष (राम विलास) आणि संयुक्त जनता दल या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

November 1, 2024 2:38 PM November 1, 2024 2:38 PM

views 11

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यासाठी 634 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.   झारखंडमध्ये, पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या १३ नोव्हेंबरला तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान, 20 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांत तर, दुसऱ्या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

October 19, 2024 8:13 PM October 19, 2024 8:13 PM

views 2

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची ६६ उमेदवारांची यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी धनवर मतदारसंघातून तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन हे सराइकेला मतदारसंघातून लढणार आहेत.   झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागा लढवणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. ७० जागांचं पक्षनिहाय जागावाटप लवकरच निश्चित केलं जाईल. ११ ज...