November 3, 2024 7:58 PM November 3, 2024 7:58 PM
10
झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर आदिवासी वगळता इतरांसाठी समान नागरी कायदा लागू करण्याचं भाजपाचं संकल्पपत्रात आश्वासन
झारखंडमध्ये सत्तेत आल्यावर समान नागरी कायदा लागू करू, मात्र आदिवासींना त्याच्या कक्षेतून बाहेर ठेवू असं आश्वासन भाजपानं दिलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं पक्षाचं संकल्प पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज रांचीमध्ये प्रसिद्ध केलं. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं. संथाल परगणा भागातली बांग्लादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कायदे बनवले जातील या लोकांनी आदिवासी महिलांसोबत विवाह करुन त्यांची जमीन हडपल्याचा दावा त्यांनी केला. कायदा झाल्यावर आदिवासींना त्यांच्या जमिनी पुन्हा दिल्या जातील. गोगो द...