November 21, 2024 8:08 PM November 21, 2024 8:08 PM

views 6

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली.     

November 21, 2024 1:14 PM November 21, 2024 1:14 PM

views 6

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६८ टक्क्यांहून अधिक मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काल ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झालं. नाला मतदारसंघात ८० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुम मध्ये ठेवली असून तिथे सीसीटीव्हीसह त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा लावली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी दिली.

November 20, 2024 8:30 AM November 20, 2024 8:30 AM

views 18

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी देखील आज मतदान होत असून या पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.   झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आज मतदान होत असून या टप्प्यात १२ जिल्ह्यांमधल्या ३८ मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या सहाशे तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत.

November 19, 2024 8:09 PM November 19, 2024 8:09 PM

views 10

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या झारखंडच्या १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार असून ३१ नक्षलग्रस्त भागांत मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणूकीत ५५ महिला उमेदवारांसह ५२८ उमेदवार रिंगणात आहेत. सुमारे १ कोटी २३ लाख मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. आंतरजिल्हा सामा बंद केल्या असून घुसखोर आणि समाजविरोधी घटकांना रोखण्यासाठी बिहार ...

November 18, 2024 9:42 AM November 18, 2024 9:42 AM

views 10

झारखंड विधानसभा : निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर खासगी वाहनांवर बॅनर वापरण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं मुख्य निवडणूक अधिकारी के. रवी कुमार यांनी सांगितलं. झारखंडमध्ये १४ हजार २१८ मतदान केंद्र असून ३१ मतदान संघांमध्ये आज दुपारी ४ वाजता आणि उर्वरित मतदान संघांमध्ये सायंकाळी ५ वाजता प्रचार संपणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्याच्या विविध भागातून १९६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आ...

November 16, 2024 8:14 PM November 16, 2024 8:14 PM

views 13

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला वेग

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशक आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या आज झारखंडमधे प्रचारसभा झाल्या. झारखंडमधलं हेमंत सोरेन सरकार आदिवासींना व्होटबँक समजून वागवत आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी प्रचारसभेत केला. हिमंता बिसवा सरमा, मिथुन चक्रवर्ती यांनीही रालोआच्या प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त...

November 14, 2024 7:53 PM November 14, 2024 7:53 PM

views 7

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला

झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांकरता मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमधे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गिरीदिह, बोकारो आणि गांडे इथं प्रचारसभा घेतल्या. झारखंडमधलं हेमंत सोरेन सरकार बांगलादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भाजपाला सत्ता मिळाली तर घुसखोरांना घालवण्यासाठी कायदा केला जाईल...

November 14, 2024 3:05 PM November 14, 2024 3:05 PM

views 14

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.५१ टक्के मतदान

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्ह्यांतल्या ४३ मतदारसंघांमध्ये काल ६६ पूर्णांक ५१ शतांश टक्के मतदान झालं. सर्वाधिक म्हणजे ७९ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान खरसावन इथं नोंदवलं गेलं. काल ६८३ उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं. सरायकेलामधून भाजपचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन, रांचीमधून राज्यसभा खासदार आणि झामुमोचे उमेदवार महुआ माजी, लोहरदगामधून काँग्रेसचे रामेश्वर ओराव, जमशेदपूर (पश्चिम) मधून जनता दल (युनायटेड)चे सरयू राय तसंच, इचागढ मधून AJSU चे हरे लाल महतो अशा महत्...

November 11, 2024 8:15 PM November 11, 2024 8:15 PM

views 12

झारखंड विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघातला प्रचार संपला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज सायंकाळी संपला. या टप्प्यातील ४३ जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात प्रचारादरम्यान दोनशेहून अधिक सभा घेण्यात आल्याचं वृत्त आमच्या वार्ताहरानं दिलं आहे. एनडीएनं बांगलादेशी घुसखोरी, हेमंत सोरेन सरकारविरोधातील भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि मासिक रोख रक्कम हस्तांतरण योजना आदी मुद्दे उपस्थित केले तर इंडीयानं केंद्राकडून झारखंडविरोधात भेदभाव, राज्याला पुरेसा निधी वाटप आणि मासिक हस्तांतरण आदी मुद्दे उपस्थित केले आहेत. दरम्यान मतदानास...

November 8, 2024 9:45 AM November 8, 2024 9:45 AM

views 10

झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

झारखंडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काल, एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या निवडणूक सभा पार पडल्या. हजारीबाग इथल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कारभारावर टीका करत नागरिक त्यांच्या चुकीच्या कारभारावर नाखूष असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   तर झारखंड मुक्ती मोर्चाच्या कल्पना सोरेन यांनी भाजपवर टीका करत त्यांच्या सत्ताकाळात राज्य पिछाडीवर गेल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस, आरजेडी, एजेएसयू आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही राज्याच्या वि...