December 9, 2024 1:39 PM December 9, 2024 1:39 PM

views 8

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू

झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष स्टीफन मरांडी यांनी सदस्यांना शपथ द्यायला सुरुवात केली आहे. शपथग्रहण संपल्यावर उद्या विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल,त्यानंतर हेमंत सोरेन सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतलं जाईल, बुधवारी राज्यपालांच अभिभाषण होईल आणि त्यानंतर राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला जाईल. 

November 5, 2024 1:27 PM November 5, 2024 1:27 PM

views 2

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड मधल्या गढवा इथं केली.   ते आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड चे प्रभारी हेमंत बिसवा सरमा यांनी मतांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन बांग्लादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. तर २०१९ मध्ये भाजपने आपल्या सरकार विरुद्ध कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन या...

November 2, 2024 3:02 PM November 2, 2024 3:02 PM

views 13

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर, आता या टप्प्यात तिथे ५२८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. या टप्प्यासाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी बत्तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तिथे पहिल्या टप्प्यासाठी येत्या १३ नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ६८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचारानंही वेग घेतला असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमि...

September 25, 2024 2:26 PM September 25, 2024 2:26 PM

views 5

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा, संयुक्त जनता दल आणि अखिल झारखंड विद्यार्थी संघटनेसोबत युती करणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. पुढच्या आठवड्यात जागा वाटप जाहीर केलं जाईल, असं भाजपाचे राज्य सहप्रभारी हिमंता बिस्व शर्मा यांनी सांगितलं.

July 25, 2024 8:22 PM July 25, 2024 8:22 PM

views 10

झारखंड विधानसभेच्या दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द

झारखंड विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ महतो यांनी आज दोन आमदारांचे सदस्यत्व रद्द केले. झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आमदार लोबिन हेम्ब्रोम आणि भाजप आमदार जे पी पटेल पक्षांतरासाठी दोषी आढळले होते. झारखंड मुक्ती मोर्चा चे आमदार लोबिन हेम्ब्रोम यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजमहल मतदारसंघात त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीला उभे राहिले होते. तर भाजपचे आमदार जे.पी पटेल यांनी हजारीबाग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती.