November 13, 2025 8:13 PM November 13, 2025 8:13 PM

views 17

Jharkhand SC: सरांडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश

३१ हजार ४६८ हेक्टरपेक्षा जास्त असलेल्या सरांडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने झारखंड राज्य सरकारला दिले आहेत. सरांडा जंगलाला १९६८ मधे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं, तरीही गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार आपल्या भूमिका बदलत आहे, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटलं आहे. राज्य सरकारने २४ हजार ९४१ हेक्टर क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून अधिसूचित करायला मान्यता दिली, मात्र क्षेत्र कमी करण्याचं काय ...

November 8, 2025 9:44 AM November 8, 2025 9:44 AM

views 42

झारखंडमध्ये माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांनी मिळवलं मोहिमेतलं मोठं यश

झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील दाट सारंडा जंगलात माओवादी बंडखोरांशी झालेल्या भीषण चकमकीनंतर सुरक्षा दलांना नक्षलविरोधी मोहिमेतलं मोठं यश मिळालं आहे. झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या संयुक्त पथकाची काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत जराईकेला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुलापू बुरू परिसरात माओवाद्यांशी चकमक सुरू होती.   दीर्घकाळ सुरू असलेल्या गोळीबारानंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आजूबाजूच्या जंगल परिसरात व्यापक शोध मोहीम सुरू केली. यामध्ये शस्त्रास्त्रे, दारूगोळा, स्फोटके आणि माओ...

September 10, 2025 2:44 PM September 10, 2025 2:44 PM

views 13

झारखंडमधे आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक

झारखंडच्या दहशतवाद विरोधी दलाच्या पथकाने आज आयसिसच्या एका संशयित दहशतवाद्याला रांची इथून अटक केली. त्याच्याकडून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. या संशयित दहशतवाद्याची ओळख पटली असून तो मूळचा बोकारो जिल्ह्यातल्या पेटारवार इथला आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

May 24, 2025 2:21 PM May 24, 2025 2:21 PM

views 20

झारखंडमध्ये कुख्यात नक्षलवादी पप्पू लोहारा याच्यासह ३ नक्षलवादी ठार

झारखंडमधल्या लातेहार जिल्ह्यात पोलिसांसोबत काल झालेल्या चकमकीत कुख्यात नक्षलवादी पप्पु लाहोरा याच्यासह तीन नक्षलवादी मारले गेले. लोहारा हा झारखंड जनमुक्ती परिषद या नक्षलवादी  संघटनेचा नेता होता. त्याच्यचावर १० लाख रुपयांचं इनाम होतं. झारखंडमधे आता मोजके नक्षलवादी उरले आहेत, असं बोकारो रेंजचे पोलीस महानिरीक्षक मायकेल राज यांनी सांगितलं. 

April 13, 2025 4:10 PM April 13, 2025 4:10 PM

views 15

झारखंडमध्ये कोब्रा आणि झारखंड जग्वार दलाचे दोन जवान गंभीर जखमी

झारखंडमध्ये पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात जराईकेला पोलिस स्थानकांतर्गत सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान कोब्रा आणि झारखंड जग्वार दलाचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. कोब्रा बटालियन, सीआरओएफ, झारखंड जग्वार आणि चाईबासा पोलिस दलाचे संयुक्त शोध अभियान अद्याप सुरू आहे. दरम्यान, लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिस दलाने केलेल्या दुसऱ्या शोध मोहिमेत माओवादी संघटनेच्या दोन सबझोनल कमांडरसह सहा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त कुमार गौरव यांनी माध्यमांना माहिती दिली.

March 24, 2025 8:08 PM March 24, 2025 8:08 PM

views 23

झारखंडमध्ये मेंदूला झालेल्या मलेरियामुळं ५ मुलं दगावली

मेंदूला झालेल्या मलेरियामुळं गेल्या १० दिवसात झारखंडमधल्या साहिबगंज जिल्ह्यातल्या अधिसूचित आद्य जमातीची ५ मुलं दगावली असल्याचं वृत्त आहे.  आणखी सुमारे २० मुलं या विकारानं ग्रस्त असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं औषध पुरवठा केला जात असून अधिक तपासासाठी  एक वैद्यकीय पथक रवाना करण्यात आलं आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून झारखंड मधल्या इतर जिल्ह्यातल्या बालकांच्या वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. 

March 6, 2025 8:03 PM March 6, 2025 8:03 PM

views 20

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून पुन्हा निवड

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची आज विधिमंडळ पक्षनेते म्हणून पुन्हा निवड झाली.  केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि खासदार के लक्ष्मण यांनी मरांडी यांच्या नावाची घोषणा केली. झारखंड विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारीही मरांडी यांच्याकडे आहे.

March 5, 2025 1:44 PM March 5, 2025 1:44 PM

views 13

झारखंडमध्ये सीमा सुरक्षा दलाचे ३ जवान जखमी

झारखंडमध्ये बालिबा वनक्षेत्रात आज आईडी स्फोट होऊन सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले. पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात जराईकेला भागात हे वनक्षेत्र आहे. जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील उपचारांसाठी त्यांना विमानाने रांची इथं नेण्यात येईल. या परिसरात शोध मोहिम सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

December 5, 2024 3:20 PM December 5, 2024 3:20 PM

views 21

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. रांची इथं राजभवनात झालेल्या समारंभात झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चाचे ६, काँग्रेसचे चार तर राष्ट्रीय जनता दलाचा एक असे हे मंत्रिमंडळातले ११ मंत्री आहेत.

November 28, 2024 8:21 PM November 28, 2024 8:21 PM

views 3

झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांचा शपथविधी

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज रांची इथल्या मोरहाबादी मैदानावर झालेल्या कार्यक्रमात त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, ज्येष्ठ आरजे...