April 17, 2025 2:16 PM April 17, 2025 2:16 PM

views 14

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या करधोरणामुळे महागाई वाढणार – जेरॉम पॉवेल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता त्यांनी जाहीर केलेल्या करधोरणामुळे महागाई वाढणार असल्याचं अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी म्हटलं आहे. शिकागो इथल्या इकॉनॉमिक क्लब ने काल रात्री आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ट्रम्प यांनी घोषित केलेले कर अपेक्षेहून अधिक असल्यानं महागाई वाढून आर्थिक प्रगती मंदावण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. याउलट, सोमवारी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत अध्यक्ष डोनाल्ड...