February 7, 2025 5:28 PM February 7, 2025 5:28 PM

views 7

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत सामना

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आज साकेत मायनेणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सामना तैवानचा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस या जोडीबरोबर होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचियान आणि विजय प्रशांत या भारतीय जोडीचा सामना शिंतारो मोचीझुकी आणि कैतो युसुगी या जपानी जोडीबरोबर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेचार वाजता सुरु होईल.

October 16, 2024 2:51 PM October 16, 2024 2:51 PM

views 13

स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियानचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

स्टॉकहोम खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा विजय सुंदर प्रशांत आणि जीवन नेदुनचेझियान यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरी गाठली. या जोडीची लढत पेट्र नौजा आणि पॅट्रिक रिकल यांच्याशी होणार आहे. दरम्यान, पुरुष एकेरीच्या पहिली फेरीत भारताचा सुमित नागल याची गाठ फ्रान्सच्या क्वेंटिन हेलीज याच्याशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार चार वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल.