January 2, 2026 3:37 PM

views 32

डॉ. टेस्सी थॉमस आणि डॉ. गगनदीप कांग यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात डॉ. अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ. टेस्सी थॉमस यांची,  तर डॉ. रा. वि. साठे जीवनगौरव पुरस्कारासाठी लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. गगनदीप कांग यांची निवड झाली आहे.    प्रत्येकी २ लाख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार प्रदान समारंभ उद्या मुंबईत आयसीटी, अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेत होणार आहे.

July 11, 2024 4:27 PM

views 18

क्रीडा पत्रकारितेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुहास जोशी, खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंग असोसिएशननं नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. विलास दळवी यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विजया नर यांनीही पॉवरलिफ्टिंग खेळात आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली आहेत. क्रीडा पत्रकारितेसाठी हा पुरस्कार प्रथमच देण्यात आला आहे.