April 19, 2025 3:09 PM April 19, 2025 3:09 PM
20
JEE Main Result: १०० पर्सेंटाईल मिळवणाऱ्यांमधे महाराष्ट्रातले ३ विद्यार्थी
एनटीए, अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं आज सकाळी ‘जेईई मेन-२०२५’ प्रवेश परीक्षेच्या सत्र-२ चे निकाल जाहीर केले. यंदा, एकूण २४ विद्यार्थ्यांनी जेईई मेन २०२५ पेपर एक मध्ये १०० पर्सेन्टाइल मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या सानिध्य सराफ, आयुष चौधरी आणि विशद जैन या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षेचा निकाल कट-ऑफ यादीसह आता जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या जेईई मेन पेपर एक च्या, सत्र दोन साठी एकूण ९ लाख ९२ हजार ३५० उमेदवारांनी परीक्षा दिली होती...