June 2, 2025 7:33 PM June 2, 2025 7:33 PM

views 16

आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरने आज जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर केला. result25.jeeadv.ac.in. या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधे पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा आवश्यक असते.

January 18, 2025 8:43 PM January 18, 2025 8:43 PM

views 11

जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

राष्ट्रीय चाचणी संस्थेने जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केलं आहे. बी. ई. आणि बी. टेक या अभ्यासक्रमांसाठी होणारी परीक्षा २२, २३ आणि २४ जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. त्यासाठीचं प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलं. इच्छुक विद्यार्थ्यांना संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ती मिळू शकतील. येत्या २८, २९ आणि ३० जानेवारी रोजी बी. ई., बी. टेकसह आर्किटेक्ट, प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी जेईई परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीची प्रवेशपत्र लवकरच मिळतील असं संस्थेने पत्रकाद्वारे कळवलं आहे.