April 21, 2025 1:43 PM
14
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचं आगमन
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स आजपासून चार दिवसांच्या भारतभेटीवर सहकुटुंब आले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. व्हान्स आज संध्याकाळी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या उपायांबाबत चर्चा होईल. तसंच जागतिक घडामोडींबाबतही दोन्ही नेते चर्चा करतील. गेल्या फेब्रुवारीमधे प्रधानमंत्री मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना उभय देशांच्या संयुक्त निवेदनात...