March 21, 2025 7:47 PM March 21, 2025 7:47 PM

views 10

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेली महिला अटक

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं खंडणीच्या आरोपावरुन अटक केली आहे. ३ कोटी रुपये दिले नाहीत तर जयकुमार गोरे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी तिने दिली होती.   सदर महिला तिच्या वकीलामार्फत 2 टप्प्यात पैसे मागत असल्याचं फोन संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. यानुसार सापळा रचत त्या महिलेला आज 1 कोटी रुपये वकिलांच्या कार्यालयात स्वीकारताना पोलिसांनी अटक केली.