April 11, 2025 3:14 PM April 11, 2025 3:14 PM
21
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन
थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले हे मानवतेचे खरे सेवक होते, त्यांनी समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं. देशासाठी त्यांचं अमूल्य योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या निवासस...