November 8, 2024 2:50 PM November 8, 2024 2:50 PM
11
एकत्रिपणे मविआच्या पाठीमागे उभं राहा, जयंत पाटलांचं आवाहन
एकनाथ शिंदेंच्या सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, तर आपण एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे,' असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये केलं. चिपळूण विधानसभा मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार प्रशांत बबन यादव यांच्या प्रचारासाठीच्या सभेत ते बोलत होते.