October 18, 2025 3:13 PM October 18, 2025 3:13 PM
89
पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना दंड
पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसंच एक वर्षाचं चांगल्या वर्तणुकीचं हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला जयंत पाटील यांनी मारहाण केली होती.