May 20, 2025 1:27 PM May 20, 2025 1:27 PM
6
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं. ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्या घेतल्यानंतर त्यांनी १९७२ मध्ये मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्र विभाग प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली. फ्रेड हॉयल यांच्यासह त्यांनी मांडलेला हॉयल-नारळीकर सिद्धांत प्रसिद्ध आहे. पुण्यात ...