December 25, 2024 7:46 PM December 25, 2024 7:46 PM

views 11

आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अग्रस्थानी

आयसीसी पुरुष कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं ९०४ गुणांसह पहिलं स्थान मिळवलं आहे. यासोबतच त्यानं कोणत्याही भारतीय गोलंदाजाने मिळवलेल्या सर्वाधिक गुणांच्या विक्रमात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी केली. ब्रिस्बेन कसोटीत ९४ धावांच्या मोबदल्यात ९ गडी टिपण्याच्या कामगिरीमुळे बुमराहनं १४ गुण मिळवून पहिलं स्थान कायम राखलं आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या मेलबर्न कसोटीत हा विक्रम मोडण्याची संधीही बुमराहला मिळणार आहे

November 27, 2024 8:22 PM November 27, 2024 8:22 PM

views 15

ICC कसोटी क्रिकेट गोलंदाजी मानांकनात जसप्रित बुमराह पुन्हा अग्रस्थानी

ICC,अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या कसोटी क्रिकेट गोलंदाजांच्या मानांकनात भारताच्या जसप्रित बुमराहनं पुन्हा अग्रस्थान पटकावलं आहे. पर्थ इथं झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात  केलेल्या कामगिरीमुळे बुमराहनं दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडाला, तसंच दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हैजलवुडला मागं टाकत पहिलं स्थान मिळवलं. पर्थ कसोटीत बुमराहनं ८ गडी बाद केले होते. 

July 10, 2024 3:12 PM July 10, 2024 3:12 PM

views 11

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहनं १५ गडी बाद केले. महिला क्रिकेटपटू स्मृती मान्धना हिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिला हा बहुमान मिळाला आहे. तिनं इंग्लंडच्या माईया बौशेअर आणि श्रीलंकेच्या विश...