August 14, 2024 1:26 PM August 14, 2024 1:26 PM

views 8

जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांची पदावरून पायउतार होण्याची घोषणा

जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांनी सप्टेंबर महिन्यात पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाला नव्या सुरुवातीची गरज असल्याचं सांगून त्यांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नसल्याचं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पक्षानं सप्टेंबर महिन्यात नव्या नेत्याची निवड केल्यानंतर फुमिओ किशिदा पद सोडतील, असा अंदाज आहे.