November 9, 2025 8:02 PM November 9, 2025 8:02 PM

views 15

प्रशांत महासागरात झालेल्या ६ पूर्णांक ७ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर, जपाननं इवाते प्रांतासाठी त्सुनामीचा इशारा

  प्रशांत महासागरात झालेल्या ६ पूर्णांक ७ रिक्टर तीव्रतेच्या भूकंपानंतर, जपाननं इवाते प्रांतासाठी त्सुनामीचा इशारा दिला आहे. या भूकंपामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला असून, काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली शिंकान्सेन बुलेट ट्रेन सेवा थोड्या काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. सानरिकू किनाऱ्याजवळ सुमारे १० किलोमीटर खोलीवर झालेल्या या भूकंपामुळे एक मीटरपर्यंत उंच त्सुनामीची शक्यता आहे अशी माहिती जपानच्या हवामान खात्यानं दिली आहे.    

November 9, 2025 3:00 PM November 9, 2025 3:00 PM

views 16

कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची जपानच्या प्रधानमंत्र्यांची योजना

जपानच्या नवनियुक्त प्रधानमंत्री सनाई ताकाइची यांनी स्वतःसह मंत्रिमंडळ सदस्यांचं वेतन कमी करण्यासाठी सरकारी कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली आहे. जपान मधल्या प्रशासकीय आणि वित्तीय सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. या प्रस्तावावर संसदेमध्ये  संबंधित मंत्र्यांच्या बैठकीत येत्या मंगळवार पर्यंत  चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या प्रस्तावानुसार प्रधानमंत्री आणि इतर मंत्र्यांना त्यांच्या खासदार म्हणून मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त  सध्या दिले जाणारे अतिरिक्त भत्ते  देखी...

November 5, 2025 12:46 PM November 5, 2025 12:46 PM

views 32

‘हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत – जपान यांच्यातली भागीदारी महत्त्वाची’

हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम ठेवण्यात भारत आणि जपान यांच्यातली भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावते, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं ८व्या भारत-जपान हिंद प्रशांत मंचाला ते संबोधित करत होते. गेल्या काही दशकांमध्ये या दोन्ही देशांमधली भागीदारी आणखी मजबूत झाली असल्याचं त्यांनी सांगितलं.   नुकत्याच झालेल्या पूर्व आशिया परिषदेत जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांच्याशी झालेल्या चर्चेत, दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा तपशीलवार आढा...

September 7, 2025 3:39 PM September 7, 2025 3:39 PM

views 25

जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा राजीनामा द्यायचा निर्णय

जपानमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘एलडीपी’, अर्थात,  ‘लिबरल डेमोक्रेटिक पार्टी’मध्ये पडणारी संभाव्य फूट टाळण्याकरता जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात इशिबा यांच्या एलडीपी प्रणित आघाडी सरकारनं तिथल्या वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावल्यानंतर आता जपानचं सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या ‘एनएचके’नं आज याबाबतचं वृत्त प्रसारित केलं. निवडणुकांमध्ये त्यांच्या आघाडी सरकारला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी पसरलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या ...

August 29, 2025 11:21 AM August 29, 2025 11:21 AM

views 14

प्रधानमंत्री टोकियोमध्ये 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियो इथं दाखल झाले असून अत्यंत  उत्साही वातावरणात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. टोकियोमध्ये होणाऱ्या 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.   जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. तसंच गेल्या 11 वर्षांत वृद्धिंगत होत असलेली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांमध्ये ...

August 27, 2025 5:31 PM August 27, 2025 5:31 PM

views 9

प्रधानमंत्री उद्यापासून जपान आणि चीन दौरा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून जपान आणि चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. ते जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्याबरोबर १५ व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल माध्यमांना दिली.   चीनमध्ये, प्रधानमंत्री ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या पंचविसाव्या बैठकीत सहभागी होतील.

April 1, 2025 6:33 PM April 1, 2025 6:33 PM

views 18

टोकियो इथं तिसरा भारत – जपान संवाद

तिसरा भारत जपान संवाद आज जपानची राजधानी टोकियो इथं झाला. अंतराळ विज्ञान क्षेत्रात उभयपक्षी हिताच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. अंतराळातल्या प्रकल्प आणि सुविधांविषयी आणि सुरक्षेविषयीचे मुद्दे चर्चेला आले. भारताच्या बाजूने इसरोचे वैज्ञानिक सचिव एम गणेश पिल्लई यांच्या नेतृत्वात तर जपानच्या बाजूने निःशस्त्रीकरण विभागाचे सचिव मुआनपुई सायावी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ या संवादात सहभागी झालं. या संवादाच्या पार्श्वभूमीवर उभय राष्ट्रातल्या आघाडीच्या उद्योजकांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.

March 28, 2025 8:18 PM March 28, 2025 8:18 PM

views 27

भारत आणि जपान यांच्यात १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार

जपानच्या, विकास सहायता कार्यक्रमांतर्गत सहा महत्वाच्या प्रकल्पांसाठी भारत आणि जपान यांच्यात १ लाख ८ हजार कोटी रुपयांचे कर्जाचे करार झाले आहेत. नवी दिल्लीत काल भारत आणि जिका अर्थात जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी यांनी या करारांवर सह्या केल्याचं अर्थमंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वन व्यवस्थापन, पाणी पुरवठा, नागरी वाहतूक, ॲक्वाकल्चर, जैवविविधता संवर्धन, गुंतवणूक प्रोत्साहन, अशा विविध क्षेत्रांमधल्या उपक्रमांना या करारामुळे बळ मिळणार आहे. 

March 8, 2025 8:50 PM March 8, 2025 8:50 PM

views 23

जपान टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण

जपानची राजधानी टोकियोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज अयोध्येतल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते झालं. भारतात हा पुतळा बनवण्यात आला आहे. आम्ही पुणेकर, इगोदावा इंडिया कल्चरल सेंटर आणि ऑल जपान असोसिएशन यांनी हा पुतळा उभारला आहे.

March 7, 2025 2:49 PM March 7, 2025 2:49 PM

views 22

जपानमधील ५० वर्षांहून अधिक काळातील सर्वात भीषण वणवा

जपानच्या ओफुनाटो शहराजवळच्या जंगलात गेल्या ५० वर्षांतल्या सर्वात मोठा वणवा लागला आहे. काल आलेल्या पावसामुळे हा वणवा पसरण्याचा धोका कमी झाला असून त्यामुळे इथल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून लागलेला हा वणवा २ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पसरला आहे.