July 20, 2025 6:50 PM July 20, 2025 6:50 PM

views 23

मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मुंबईतल्या कार्यालयात आज जनता दरबाराचं आयोजन केलं गेलं. यावेळी गोयल यांनी नागरिकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी नागरिकांनी महानगरपालिका, गृहनिर्माण संस्था, पोलीस विभागांशी संबंधित आपल्या तक्रारी मांडल्या. तातडीनं या समस्या सोडवाव्यात असे निर्देश गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना  यावेळी दिले.

May 17, 2025 3:13 PM May 17, 2025 3:13 PM

views 17

नागपूरमधे जनता दरबारचं आयोजन

जनता दरबारात आपले प्रश्न सोडवले जातील अशा विश्वासाने नागरिक मोठ्या प्रमाणात याउपक्रमात सहभागी होतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.   नागपूरमधे हैदराबाद हाऊस इथं आयोजित जनता दरबाराच्या वेळी ते बोलत होते. या दरबारात सादर होणाऱ्या जनसामान्यांच्या अडी अडचणी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात आणि त्या बाबत पाठपुरावाही केला जातो असं मुख्यमंत्री म्हणाले.