August 26, 2024 9:08 PM August 26, 2024 9:08 PM
13
देशभरात गोकुळाष्टमीचा उत्साह
भगवद्गगीतेतून विश्वाचं ज्ञान दिलेल्या श्रीकृष्णाचा जन्मसोहळा म्हणजेच गोकुळाष्टमी आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी होत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळीच्या मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज मध्यरात्री हा सोहळा रंगणार आहे. मथुरेसह देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मथुरेबरोबरच वृंदावन इथल्या जन्माष्टमी सोहळ्यालाही विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे...