November 15, 2025 6:55 PM
50
राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्धाटन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्रात एक कोटी २५ लाख आदिवासी असून १६ जिल्ह्यात त्यांच्या ४५ जमाती आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल, जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्...