October 3, 2025 3:33 PM October 3, 2025 3:33 PM
44
जगविख्यात प्रायमेट्स आणि मानववंश वैज्ञानिक जेन गुडॉल यांचं निधन
जगविख्यात प्रायमेट्स आणि मानववंश वैज्ञानिक जेन गुडॉल यांचं काल अमेरिकेत निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होत्या. निसर्ग जतनासाठी आयुष्याची साठ वर्षं अथकपणे कार्य करणाऱ्या जेन गुडॉल यांनी, चिंपांझी आणि त्याप्रकारच्या प्राण्यांच्या अभ्यासात क्रांती घडवली. त्यांच्या कार्यामुळे प्राण्यांच्या अधिकारावर नव्यानं विचार होऊ लागला. वन्य प्राण्यांची वसतीस्थानं नष्ट होत असल्याबाबत त्यांनी जगाला हवामान बदलावर तातडीनं कृती करण्याचं आवाहन केलं होतं.