August 12, 2024 6:58 PM August 12, 2024 6:58 PM

views 3

महायुतीचं जागावाटप सर्व घटकपक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप सर्व घटकपक्षांचे नेते एकत्र बसून ठरवतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. त्यांच्या उपस्थितीत आज धुळे शहरात 'जन सन्मान यात्रा' झाली, त्यावेळी ते बोलत होते.  जागा वाटपाचा निर्णय योग्य पध्दतीनं होईल. काम करणाऱ्याच्या पाठीशी पक्ष उभा राहिल, असं ते म्हणाले. निवडणुकीनंतर पुन्हा आमचं सरकार येईल, असा विश्वासही अजीत पवार यांनी व्यक्त केला.